अहिल्यानगर : चालू गळीत हंगामात शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने ५,८५,७४० मेट्रिक टनाचे ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांना प्रती टन २,७०० रुपयांप्रमाणे बिले अदा केली आहेत. आता येत्या दिवाळीपूर्वी उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल, अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केली. शुक्रवारी कारखान्यातील रोलर पूजन कार्यक्रमात नागवडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते.
मिल रोलर पूजन संचालक योगेश भोईटे, सभासद संदीप औटी यांच्या हस्ते झाले. यावेळी चेअरमन नागवडे म्हणाले की, नागवडे कारखान्याने कधीही शेतकरी आणि कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली नाही. नेहमीच कामगार, शेतकरी आणि ऊस वाहतूकदारांना न्याय देण्याचे काम केले आहे. सरत्या गळीत हंगामात कारखान्याने ५,८५,७४० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. प्रती टन २,७०० रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. आता पुढील गळीत हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. कारखान्याचे बाबासाहेब भोस यांचे भाषण झाले. संचालक सुभाष शिंदे, श्रीनिवास घाडगे, भाऊसाहेब नेटके, शरद जगताप, डी. आर. काकडे, प्रशांत शिपलकर, विश्वनाथ गिरमकर, विठ्ठल जंगले, बंडू जगताप, भाऊसाहेब मासाळ, प्र. कार्यकारी संचालक सतीश जांभळे आदी उपस्थित होते. भाऊसाहेब बांदल यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सावता हिरवे यांनी आभार मानले.