नागवडे कारखान्याचा उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न : राजेंद्र नागवडे

अहमदनगर :  बाहेरील कारखान्यांप्रमाणे नागवडे कारखान्याचे उच्चांकी गाळप झाल्यास उसाला चांगला  भाव देण्यात मागे राहणार नाही, अशी ग्वाही नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.

नागवडे कारखान्याची ५८ वी वार्षिक सभा किरकोळ वाद वगळता शांततेत झाली. ज्येष्ठ नेते घनशाम शेलार, बाबासाहेब भोस, केशवराव मगर, बाबासाहेब इथापे, गणपतराव काकडे, जिजाबापु शिंदे, अॅड. विठ्ठलराव काकडे, संदीप नागवडे, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागवडे म्हणाले की, कारखान्यावर सातशे कोटींचे कर्ज झाल्याचा कांगावा करून काही लोक सभासदांची दिशाभूल करीत आहेत. २०५ कोटींचे प्रत्यक्ष कर्ज असून, त्यातील ११० कोटी हे साखरेसाठी घेतलेले असल्याने कारखान्यावर वास्तवात केवळ ९० कोटींचे कर्ज आहे.अंबालिका आणि इतर कारखान्यांएवढे गाळप होईल त्यावेळी त्यांच्याएवढाच दर देऊ, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बीआरएसचे नेते घनशाम शेलार, केशवराव मगर, विठ्ठलराव काकडे, पोपट ठाणगे, तुकाराम कोकरे, त्रिंबक मुठाळ, श्रीपाद खिस्ती, शहाजी गायकवाड, साहेबराव जाधव, हनुमंत झीटे, सुनील जाधव, भाऊ मांडे, शिवाजी नलावडे, किरण नागवडे, आदींची भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here