नांदेड : राज्यातील लातूर, परभणी, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांतील कारखाने उसाच्या शोधात बारूळ व पेठवडज परिसरात आले आहेत. मागील दोन वर्षांपासून बारूळ व हळदा येथे गूळ कारखाना सुरू झाल्याने काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु, त्याची क्षमता कमी असल्यामुळे व उत्पादक जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना कारखान्यांना ऊस देण्याशिवाय पर्याय नव्हता. यावर्षी उसाचे उत्पादन कमी झाल्याने परिसरातील बहुतांश कारखानदार आम्हाला ऊस द्या, म्हणून बारूळ परिसरात दाखल झाले. दररोज प्रत्येक कारखान्याचे चेअरमन येऊन भेटी देत आहेत. आम्हाला ऊस द्या, चांगला भाव देऊ अशी आश्वासने ते शेतकऱ्यांना देत आहेत.
कंधार तालुक्यातील मानार प्रकल्प व पेठवडज मध्यम प्रकल्पाशेजारी बारूळ, चिंचोली, धर्मापुरी, तेलूर, वरवंट, काटकळंबा, बाचोटी, पेठवडज, मानसपुरी, जंगमवाडी, वळसंगवाडी या गावांत मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली. यंदा दिवाळीच्या आधीच राज्यातील कारखान्याच्या टोळ्या ऊस तोडणीसाठी बारूळ परिसरात हजर झाल्या होत्या. मागील वर्षी पावसाळा कमी झाला असला, तरी यंदा पावसाळा चांगला झाला. मात्र उसाच्या लागवडीमध्ये मोठी तूट दिसून येते. त्यामुळेच काही ऊसतोड मजुरांच्या टोळ्या हार्वेस्टर आणि ऊस वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या आधी व निवडणूक झाल्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने दिसत आहेत. ऊसतोड कामगार व यंत्रणेद्वारे ऊस उचलण्याची कामे सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चिंता मिटली आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.