नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांची शुक्रवारी (ता. २५) निवड झाली आहे. अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. कारखान्याच्या सभागृहात विभागीय उपसंचालक साखर विश्वास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. निवडणूक प्रक्रियेत कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. पाटील यांनी सहभाग नोंदविला. यावेळी किशोर स्वामी, गोविंदराव शिंदे, लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते.
रिक्त अध्यक्षपदासाठी नरेंद्र चव्हाण यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अध्यक्ष निवडीच्या विशेष सभेला कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष गणपतराव तिडके, व्यंकटराव अॅड. सुभाष कल्याणकर, प्रा. कैलास दाड, कल्याणकर, सुभाषराव देशमुख, मोतीराम जगताप, आनंदराव सावते, साहेबराव राठोड, बळवंत इंगोले, लालजी कदम, दत्ता सूर्यवंशी, दत्ताराम आवातिरक, शिवाजी पवार, माधवराव शिंदे, बालाजी शिंदे, अशोक कदम आदी संचालक उपस्थित होते. नरेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, तुम्ही सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.