नांदेड : येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचे मोळी व गव्हाण पूजन कारखान्याचे अध्यक्ष अजय देशमुख-सरसमकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सारंग गडकरी, नितीन भुतडा, माजी सभापती सविता चित्तांगराव कदम यांची उपस्थिती होती. माजी खासदार हेमंत पाटील यांनी हा कारखाना भाडे तत्त्वावर चालवण्यासाठी घेतला आहे. कारखान्याचे चालू वर्षात पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे.
वसंत सहकारी साखर कारखान्यामुळे पंचक्रोशीतील उमरखेड, महागाव, पुसद, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या कारखान्याच्या माध्यमातून आमदार हेमंत पाटील यांनी कायमच शेतकऱ्यांना झुकते माप दिले आहे. कारखाना सुरू झाल्याने शेतमजूर, बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी हा कारखाना वरदान ठरत आहे. यंदाच्या हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.