नांदेड – व्हीपीके उद्योग समूह उसाला उच्चांकी दर देणार : चेअरमन मारोतराव कवळे

नांदेड : उमरी तालुक्यातील व्हीपीके उद्योग समूहाच्या एमव्हीके ॲग्रो प्रा. लि. कुसुमनगर वाघलवाडाकडून ऊस गाळप गतीने सुरू आहे. कारखान्याकडून यंदाच्या हंगामात उसाला उंचाकी दर दिला जाणार आहे अशी घोषणा चेअरमन मारोतराव कवळे यांनी नुकतीच केली. एमव्हीके ॲग्रो कारखान्यास आणलेल्या ऊसास एक ते १५ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यास प्रतिटन २३६० रुपये दर देण्यात आला आहे. तर १६ ते ३१ जानेवारीपर्यंत प्रतिटन २४१० रुपये असा दर दिला आहे. आता १ ते १५ फेब्रुवारी या काळातील उसाला २४६० रुपये आणि १६ ते २९ फेब्रुवारी या काळातील उसाला २५१० रुपये दर दिला जाईल. १ ते १५ मार्च या काळातील उसाला २५६० रुपये आणि १६ ते ३१ मार्च या काळातील उसाला प्रती टन २६१० रुपये पहिला हप्ता देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली.

दरम्यान, व्हिपीके उद्योग समूहातील दोन गूळ पावडर कारखाने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस प्रत्यक्ष गाळपास सुरू करण्यात आले आहेत. व्हीपीके ॲग्रो प्रयागनगर सिंधी, डॉ. शंकरराव चव्हाण जागरी अॅग्रो प्रॉडक्ट कुसुमनगर वाघलवाडा यांच्याकडूनही गतीने ऊस गाळप सुरू आहे. कारखान्याने जाहीर केलेल्या योजनेचा ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कवळे गुरुजी यांनी केले आहे. यावेळी व्हीपीके उद्योग समूहाचे सीईओ संदीप पाटील कवळे, सरव्यवस्थापक श्रीराम आंबटवार, सचिव नागनाथ पांचाळ, आर्थिक सल्लागार उदयकुमार कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णाराव पाटील, नामदेवराव इंगोले, ए. जी. खेडकर, बी. एस. गाढे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here