नंदुरबार : ०२ डिसेंबर २०२४ रोजी श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना लि. संचलित ओंकार शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि. युनिट नं.०९ (पुरुषोत्तम नगर ता. शहादा, जि. नंदुरबार) या साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ चा बॉयलर अग्निप्रदिपन व मोळी पूजन सोहळा बापुसो दिपक पुरुषोत्तम पाटील (चेअरमन तापी परिसर सह. साखर कारखाना लि., पुरुषोत्तमनगर) यांच्या शुभहस्ते आणि बाबुराव बोत्रे-पाटील (चेअरमन ओंकार साखर कारखाना ग्रुप ) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेखाताई बोत्रे- पाटील (संचालिका) आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी अशोक पाटील (युनिट हेड), मिलिंद पटेल (जनरल मॅनेजर), ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, तोडणीदार, मुकादम, कारखान्याचे सभासद, सर्व संचालक मंडळ, आजी माजी संचालक, सर्व खाते प्रमुख, सर्व विभाग प्रमुख, सर्व कर्मचारी वर्ग, सर्व पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.