शरद पवार यांच्या उपस्थितीत १० मार्च ला होणार शेतकरी संवाद

कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. हाता-तोंडाशी आलेले पिक वाया गेले. तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आले होते. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. आता पुन्हा १० मार्च रोजी पवार कळवण तालुक्याच्या दौऱ्यावर येऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधणार आहेत. शहरातील हरी ओम लॉन्स येथे हा शेतकरी संवाद मेळावा होणार आहे. लोकनेते ए. टी. पवार आदिवासी सांस्कृतिक भवन उद्घाटन, कळवण नगरपंचायत हद्दीतील विकास कामांचा लोकार्पण सोहळा पवारांच्या हस्ते व आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती आम नितीन पवार यांनी दिली.

कळवण शहरात शेतकरी संवाद मेळाव्यासह कळवण नगरपंचायतच्या विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह नाकोडा येथे आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते नारायण हिरे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. यावेळी आम पवार बोलत होते.

या मेळाव्यास तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, रवींद्र देवरे, गटनेते कौतिक पगार, बाजार समिती सभापती धनंजय पवार, मविप्र संचालक अशोक पवार, मजूर संघाचे माजी अध्यक्ष शरद गुंजाळ, हेमंत पाटील, संजय पवार, विजय शिरसाठ, संतोष देशमुख उपस्थित राहणार आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here