उसाच्या रस शुद्धीकरण प्रक्रियेत नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटला मिळाले यश

कानपूरच्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटने उसाच्या रसाची शुद्धीकरण प्रक्रियेत मोठे यश मिळवले आहे. दी शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया आणि मेसर्स केमिकल सिस्टम टेक्नॉलॉजीज नवी दिल्ली यांच्या सहयोगाने संस्थेने प्रायोगिक तत्त्वावरील साखर कारखान्यात नव विकसित तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण केले.

पारंपरिक तंत्राने ऊसाचा रस काढताना उसातील अशुद्ध घटक पारंपरिक पद्धतीने जड असल्याने तळाला जाऊन बसतात. त्यानंतर त्यांना तेथून दूर करण्यात येते. या प्रक्रियेला साधारणतः २ ते अडीच तासांचा कालावधी लागतो. या काळात रंग विकसित होतो. आणि रसही थंड होतो. यास वेळ लागत असल्याने साखरेचे नुकसान होते. विकसित तंत्रानुसार रसातील अशुद्ध घटक तरंगत्या माध्यमातून रसापासून बाजूला केले जातात. त्यास केवळ ३० ते ४५ मिनिटांची गरज असते. त्यातून पारंपरिक प्रक्रियेतील त्रुटी दूर करणे शक्य आहे.

नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन यांनी सांगितले की आम्ही यासाठी खास करुन डिझाईन केलेल्या रिअॅक्टर, एअररेटर, फ्लोटेशन क्लॅरिफायरचा वापर केला आहे. या प्रक्रियेत अशुद्ध घटक हवेच्या बुडबुड्यांच्या मदतीने तरंगत राहतात. त्यामुळे त्यांना स्क्रॅपरद्वारे हटवले जाते. या शुद्धीकरण प्रक्रियेत चांगल्या गुणवत्तेची साखर तयार होते. प्रक्रियेवेळी त्याचे कमी नुकसान होते.

साखरेला सर्वात वरच्या मार्गाने बाजूस करणे चांगले आहे. अशा प्रकारच्या प्रक्रियेत साखरेचे नुकसान शक्य असते. संचालक मोहन म्हणाले की, पारंपरिक प्रक्रियेत लागणारा वेळ दोन तृतीयांश पेक्षा अधिक कमी केला जातो. साखर कारखान्यांना नुकसान कमी करण्यास यातून मदत मिळेल.

शुगर इंजिनीअरिंगचे सहाय्यक प्रा. अनुप कनौजिया म्हणाले, की, या प्रक्रियेत छोट्या आकाराच्या उपकरणांची गरज भासते. त्यातून खर्च कमी होतो. आम्ही हे तंत्र पारंपरिक पद्धतींपासून शुगर रिफायनरीच्या जागी विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here