कानपुर : साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थिरतेमध्ये सुधारणा करण्यासाठी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपूरकडून तमिळनाडू आणि तेलंगणातील साखर कारखान्यांना तांत्रिक माहितीची मदत पुरवणार आहे. साखरेचे उपपदार्थ, खास करून साखर आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांवर अधिक भर देता येईल असे प्रयत्न आहेत. संस्थेच्या सहाय्यासाठी आणि विचारविनिमय करुन नियम, अटींना अंतिम रूप देण्यासाठी पोन्नी शुगर्स (इरोड) लिमिटेडच्या एका शिष्टमंळाने संचालन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बी. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली एनएसआयचा दौरा केला.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात, एनएसआयकडून त्यांच्या पारंपरिक साखर युनिटला ४५० मेट्रिक टन प्रती दिन क्षमतेच्या साखर रिफायनरीत परिवर्तीत करणे आणि बगॅसपासून टेबलवेरअर (कटलरी) बनविण्यासाठी एक नव्या युनिटची स्थापना यासाठी तांत्रिक सहाय्यता प्रदान केली जाणार आहे. नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, एकल साखर कारखान्यांना प्रभावीपणे उप-उत्पादने मिळविण्यासाठी उपलब्ध यंत्रणेच्या प्रभावी वापरासोबतच अनेक उत्पादने घेणाऱ्या परिसरामध्ये त्याची क्षमता परावर्तीत करणे, हा साखर उद्योग व्यवहार्य बनविण्याचा एकमेव पर्याय आहे.
त्यांनी सांगितले की, इतर उद्योगांबरोबरच वैविध्यिकरण आणि एकीकरणातील सफलता महत्त्वाची आहे. याबाबत चेन्नईतील आमच्या प्राथमिक बैठकीत चर्चा झाली. आता पुढील टप्प्यात संस्थेची टीम जुलैमध्ये साईटची पाहणी करेल.तेलंगणातील साखर कारखान्यांचा अन्य समूह, गायत्री शुगर्स लिमिटेडनेही विविध जैव रसायने, वॅनिलिन, ग्रॅफिन ऑक्साईडच्या उत्पादनासाठी संस्थेची मदत मागितली आहे.