नजीबाबाद : दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर संघाने यंदाही नजीबाबाद साखर कारखान्याला राष्ट्रीय दक्षता पुरस्कारासाठी निवडले आहे. साखर कारखान्याला ऊस व्यवस्थापनासाठी सहकारी साखर कारखान्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. लवकरच कारखान्याला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
किसान सहकारी साखर कारखाना नजीबाबादने यावर्षीही सहकारी साख कारखान्यांच्या गटात राष्ट्रीय दक्षता पुरस्कारावर आपला ठसा उमटवला आहे. कारखान्याला ऊस व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील राष्ट्रीय दक्षता पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. कारखान्याने आतापर्यंत जवळपास १८ पुरस्कार या विभागाअंतर्गत मिळवले आहेत. याशिवाय कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्यावतीने चार वेळा सहकारी साखर कारखानदारीत सर्वोत्कृष्ठ कारखान्याचा पुरस्कारही मिळाला आहे. कारखान्याने आर्थिक व्यवस्थापन, तांत्रिक तथा आर्थिक दक्षतेमध्येही अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक सुखवीर सिंह यांनी राष्ट्रीय दक्षता पुरस्काराबद्दल प्रशासक, प्रशासकीय व्यवस्थापन, कारखाना कर्मचारी, शेतकरी आणि कामगार संघटनांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.