रमाला (बागपत) : रमाला सहकारी साखर कारखान्याला २६ मार्च रोजी गळीत हंगाम २०१९-२० मधील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल राष्ट्रीय दक्षता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. गुजरातमधील वडोदरा येथे हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. देशभरातील साखर कारखानदारीत वेळेवर आणि पुरेशा ऊस गाळपासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल भारती यांनी दिली.
रमाला सहकारी साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक डॉ. आर. बी. राम यांनी सांगितले की, दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक विमल दुबे यांना पत्र लिहून पुरस्काराबद्दल माहिती दिली आहे. मुख्य संचालकांच्या नेतृत्वाखालील पुरस्कार निवड समितीने रमाला सहकारी साखर कारखान्याला संपूर्ण देशभरातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये वेळेवर उसाचे अधिक गाळप केल्याबद्दल राष्ट्रीय दक्षता पुरस्काराने निवड करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पत्रात देण्यात आली आहे.
दरम्यान, पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर कारखाना प्रशासन, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह संचालक मंडळ, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दोन वर्षांपूर्वी कारखान्याची गाळप क्षमता दुप्पट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत रमाला येथे नव्या गाळप हंगामाचे उद्घाटन केले होते.
कर्ज मंजुरीची मागणीदरम्यान, मिताली गावचे सोहनपाल सिंह यांनी सहाय्यक आयुक्त तथा सहकारी निबंधकांना पाठविलेल्या पत्रात कर्ज मंजुरीची मागणी केली आहे. ते बागपत साखर कारखान्याच्या कृषी आणि सहकार समितीचे सदस्य आहेत.