मेरठ : व्यवस्थापन आणि कार्यप्रणालीत सुधारणा केल्याबद्दल साखर कारखान्यांना राष्ट्रीय दक्षता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये बागपतच्या रमाला कारखान्यासह उत्तर प्रदेशमधील इतर कारखान्यांचा समावेश आहे.
ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय दक्षता पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये मेरठ विभागातील बागपत जिल्ह्यातील रमाला साखर कारखान्याने जादा ऊस गाळपाचा पुरस्कार मिळाला आहे. गाळप हंगाम २०१९ मध्ये ८३ क्विंटल ऊसाचे गाळप करून रमाला कारखान्याने पुरस्कार पटकावला आहे. सोबतच बिजनौर कारखान्याने सलग तिसऱ्या वर्षी देशात सर्वोत्तम कारखान्याचा पुरस्कार पटकावला. याशिवाय पुवाया शाहजहांपूर येथील कारखान्याने अधिक साखर उत्पादन, तिलहर शाहजहांपूर कारखान्याने ऊस विकास, सेठीया आजमगढ कारखान्याने तांत्रिक दक्षता पुरस्कार पटकावला. या पुरस्कारांचे वितरण नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात होणार आहे.