नवी दिल्ली : शेतकऱ्यांवर निसर्गाचा वार जोरदार सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडला नसल्याने मार्च महिन्यातही तापमान वाढले आहे. दरम्यान, १४ मार्च रोजी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या कोरड्या असलेल्या हवामानामुळे गव्हाच्या पिकावर संकट घोंघावू लागले आहे. मार्च महिन्यताली तापमान वाढ आणि किमान तापमानात वाढ झाल्याने गव्हाचे पिक उन्हाच्या तडाख्यात सापडल्याचे दिसून येत आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, फेब्रुवारी महिन्यातील तापमान गव्हाच्या पिकासाठी अनुकूल नव्हते. आता मार्च महिन्यात अशीच स्थिती आहे. मार्च महिन्यात १२ दिवस आणि रात्रीचे तापमान नियमितपेक्षा अधिक राहिले. त्याचा थेट परिणाम गव्हाच्या उत्पादनावर दिसत आहे. हवामान बदल असाच पुढे सुरू राहिल अशी शक्यता आहे. गव्हाच्या पिकासाठी सध्या अनुकूल हवामान नाही. आगामी आठवडाभर तापमान ३५ डिग्रीपर्यंत पोहोचू शकते. गव्हाच्या पिकाला उन्हापासून वाचविण्यासाठी हलक्या सिंचनाची गरज आहे असे हवामान तज्ज्ञ डॉ. एन. सुभाष यांनी सांगितले. तर हंगामात हा रविवार सर्वाधिक गरम होता असे सांगण्यात आले.