महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय नौदलाच्या पाच बचाव पथकांना पाचारण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम कोल्हापूर आणि सांगली येथे झाला आहे.
कोल्हापुरातील सुमारे 7000 लोकवस्ती असलेली तीन गावे पूरग्रस्त झाली होती. मंगळवारी दोन्ही जिल्ह्यातून 50 हजार लोकांना बाहेर काढण्यात आले.
या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांना मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडून पश्चिम नौदल कमांडच्या पाच सघटनांना पाचारण करण्यात आले, असे संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले.
सुरुवातीला बचाव पथकांचे त्या ठिकाणी जाण्यासाठी नियोजन करण्यात आले होते, परंतु प्रतिकूल हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी मिळाली नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर पथके रात्रभर पुण्याकडे रवाना झाली.
बुधवारी सकाळी नौदलाच्या अतिरिक्त मुंबईहुन पाच पूर-मदत पथकेही पूरग्रस्त भागात जाण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गोवा नौदल क्षेत्रानेही कोल्हापुरात बचावकार्यासाठी गोताखोरांची चार पथके तैनात केली आहेत.
गोव्यातील आयएनएस हंसा नेवल एअर स्टेशन वरून कोल्हापूर एअरफील्डसाठी बुधवारी सकाळी बचाव पथकांसह डाईव्हिंग उपकरणांसह, उड्डाण करणारे हवाई परिवहन पथक रवाना करण्यात आले. पुणे विभाग विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर म्हणाले, कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परिस्थिती गंभीर आहे कारण या भागातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापुरातील 7,000 लोकसंख्या असलेली तीन गावे पूर्णपणे तोडण्यात आली आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे कोल्हापुरातील 103 पैकी 34 पुल पाण्याखाली गेले आहेत. असे ते म्हणाले.
पुणे विभागातील सुमारे 53,582 लोकसंख्या असलेल्या एकूण 12,228 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर व सांगलीच्या प्रशासनाने बुधवारी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.