पाकिस्तान : चौधरी साखर कारखाना प्रकारणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज ला एक मोठा दिलासा मिळाला आहे. लाहोर उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला आहे. मरियम आणि त्यांचे चुलत भाऊ यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय जवाबदेही ब्यूरो (एनएबी) ने अटक केली होती. एनएबी च्या विशेष कोर्टाने त्यांना 25 सप्टेंबरला न्यायालयीन कोठडी दिली होती.
पाकिस्तान सरकारच्या आर्थिक निगराणी करणार्या ईकाईने चौधरी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, साखर कारखान्यात अरबो रुपयांचा अपहार केला गेला. मरियम ला मनी लॉन्ड्रिग प्रकरणात अटक केली गेली. एनएबी ने असाही दावा केला की, तीन परदेशी लोकांनी कारखान्याच्या प्रमुख मरियम नवाजच्या नावावर, करोडो रुपयांचा अपहार केला आहे.
लाहोर उच्च न्यायालयातील अधिकार्याने सांगितले की, मरियम यांना त्यांच्या गुणदोषाच्या आधारावर जामीन देण्यात आला आहे. अधिकारी म्हणाले की, कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतरच हा जामीन दिला आहे. कोर्टाने सांगितले की, जोपर्यंत त्यांच्या विरोधात मनिलॉन्ड्रिगचा आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवले जावू शकत नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.