कॉंग्रेस-राष्ट्रवादीने साखर उद्योगाच्या बालेकिल्ल्यात केले जोरदार पुनरागमन

कोल्हापुर: महाराष्ट्रातील राजकारण साखर उद्योगाभोवती फिरत असते आणि असा कोणताच राजकीय पक्ष नाही जो साखर उद्योगापासून दूर राहू शकेल.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत  सुमारे ६९ साखर कारखानदार निवडणूक  रिंगणात उभे होते. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालानुसार ६९ पैकी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 44 उमेदवारांनी बहुमता सोबत विजय नोंदविला.

सत्ताधारी पक्ष भाजप-शिवसेनेच्या युतीने निवडणूक लढविण्यासाठी 33 साखर कारखानदारांना उभे केले होते, तर राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या तिकिटावरुन  31 कारखानदारांनी निवडणूक लढविली होती. आणि पाच कारखानदारांनी अन्य पक्षांकडून आपले नशीब आजमावले होते.

भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी राज्यात चांगली कामगिरी केली असेल, परंतु साखर कारखानदारांनच्या जागा राखण्यास ते अपयशी ठरले, 33 पैकी केवळ १३ मतदारसंघात त्यांनी विजय मिळाला आहे.

याउलट २०१४ चा विधानसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता कॉंग्रेस-राष्ट्रवादीची यावेळची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. आघाडीच्या साखर कारखानदार उमेदवारांनी 31 पैकी 26 जागा जिंकल्या.आणि अन्य पक्षांतील पाचही अपक्ष उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून निवडणूक जिंकली.

साखर कारखानदारांना हाताशी धरत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रावरती नेहमीच आपली पकड ठेवली आहे.
नंतर बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजप-शिवसेनेने या बालेकिल्ल्यात प्रवेश केला होता. परंतु आता या निवडणुकीच्या निकालामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी-कॉंग्रेस ने  महाराष्ट्रातील साखर उद्योगात मोठ्या संख्येने आपली उपस्थिती निर्माण करत पकड आणखी मजबूत केली.

ऊस उत्पादक राज्यातील प्रमुख मतदार आहेत, त्यामुळे साखर कारखानदारांनी त्यांना हाताशी धरण्याची कोणतीही कसर सोडली नव्हती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्राची जीवनरेखा समजल्या जाणाऱ्या सरकारच्या ऊस धोरणावर टीका केली होती.आणि हीच पवारांची जादू त्यांच्या पक्षासाठी वरदान ठरली.

एकूण २८८ पैकी २२० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपा-शिवसेना युतीने ठेवले होते, परंतु ते लक्ष्य साध्य करण्यात ते अपयशी ठरले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा २४ जागा कमी जागा जिंकत केवळ १६१ जागां पर्यंत मर्यादित राहिले तर राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीने एकूणच चांगली कामगिरी केली. 2014 च्या 15 जागांवरून  २०१९ च्या विधानसभेमध्ये  98 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने विजय मिळविला.

भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतर विजयी साखर कारखानदार उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे:
पश्चिम महाराष्ट्र

पुणे

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी
खेड-आळंदी – दिलीप मोहिते, राष्ट्रवादी
दौंड – राहुल कुल, भाजप
बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी
भोर – संग्राम थोपटे, काँग्रेस

कोल्हापूर

इचलकरंजी – प्रकाश आवडे, अपक्ष
करवीर – पी एन पाटील, काँग्रेस
कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील, काँग्रेस
शिरोळ – राजेंद्र पाटील, अपक्ष
हातकणंगले – राजू आवळे, काँग्रेस
शाहूवाडी – विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

सांगली

इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी
पलुस-कडेगाव – विश्वजीत कदम, काँग्रेस
शिराळा – मानसिंग नाईक, राष्ट्रवादी

सातारा

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
पाटण – शंभूराजे देसाई, शिवसेना
सातारा – शिवेंद्रराजे भोसले, भाजप

सोलापूर

करमाळा – संजय शिंदे, अपक्ष
पंढरपूर – भारत भालके, राष्ट्रवादी
बार्शी – राजेंद्र राऊत, अपक्ष
माढा – बबन शिंदे, राष्ट्रवादी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, भाजप

अहमदनगर

कर्जत-जामखेड – रोहित पवार, राष्ट्रवादी
कोपरगाव – आशुतोष काळे, राष्ट्रवादी
नेवासा – शंकरराव गडाख, क्रांतीकारी शेतकरी पक्ष
राहुरी विधानसभा – प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, भाजप
शेवगाव – मोनिका राजाळे, भाजप
श्रीगोंदा – बबनराव पाचपुते, भाजप
संगमनेर – बाळासाहेब थोरात, काँग्रेस
पारनेर – निलेश लंके, राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र

नाशिक

येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी

विदर्भ

भंडारा

साकोली – नाना पटोले, काँग्रेस

मराठवाडा

औरंगाबाद

फुलंब्री – हरीभाऊ बागडे, भाजप

परभणी

गंगाखेड – रत्नाकर गुट्टे, रासप

जालना

परतूर – बबनराव लोणीकर, भाजप
घनसावंगी – राजेश टोपे, राष्ट्रवादी

उस्मानाबाद

तुळजापूर – राणाजगजीतसिंह पाटील, भाजप

परांडा – तानाजी सावंत, शिवसेना

नांदेड

भोकर – अशोक चव्हाण, काँग्रेस

लातूर

निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर, भाजप
लातूर ग्रामीण – धीरज देशमुख, काँग्रेस
लातूर शहर – अमित देशमुख, काँग्रेस

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here