मनीला : हवामानातील बदलामुळे देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरेसा पुरवठा ठेवण्यासाठी अतिरिक्त साखर आयातीची गरज आहे, असे प्रतिपादन फिलीपाइन्सच्या शुगर नियामक प्रशासनाने (SRA) म्हटले आहे. फिलिपाइन्समध्ये रिफाइंड साखर उत्पादन या पिक हंगामात १,००,००० मेट्रिक टन (MT) कमी होईल अशी अपेक्षा आहे. एका प्रसारमाध्यमला दिलेल्या मुलाखतीत SRA चे कार्यवाहक प्रशासक पाब्लो लुइस अजकोना यांनी सांगितले की, प्रक्रियाकृत साखर उत्पादनात १,००,००० मेट्रिक टनाची घसरण होवू शकते.
अजकोना यांनी सांगितले की, देशात ६,४०,००० मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशातील रिफायनरी बंद झाल्या आहेत. आणि आम्ही आताही गेल्या वर्षी उत्पादित ७,५०,००० मेट्रिक टन साखरेपेक्षा खूप मागे आहोत. त्यांनी जोरदार पावसाला साखर उत्पादनातील घसरणीबाबत जबाबदार धरले आहे. अजकोना म्हणाले की, शेतकरी जोरदार पावसात ऊस तोडणी करू शकत नाहीत. त्यामुळे कारखान्याला ऊस मिळत नाही. अजकोना म्हणाले की, बहुतांश कारखानदारांनी एसआरएला सांगितले की, त्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे. देशांतर्गत बाजारात पुरेशा साखरेसाठी आम्ही १,५०,००० मेट्रिक टन साखर आयात करण्याची शिफारस केली आहे. तरच आमच्याकडे बफर स्टॉक राहील.