नवी दिल्ली : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (फिक्की) देशभरात २५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लॉकडाऊन टाळण्याचे आवाहन केले आहे. लॉकडाऊन लागू झाल्यास अर्थव्यवस्था घसरणीला लागेल असे पत्रात म्हटले आहे. फिक्कीचे चेअरमन उदय शंकर यांनी कोरोना महामारी प्रतिबंध आणि भूमिका याबाबत सविस्तर पत्र लिहिले आहे. सद्यस्थितीत अर्थव्यवस्था लॉकडाउनमुळे अडचणीत आहे. राज्यात पुन्हा एक अथवा अंशतः लॉकडाऊन सुरू करण्यापासून लांब राहीले पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे.
फिक्कीने दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, राजस्थान, त्रिपुरा, मेघालय, झारखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, गोवा, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-कश्मीर, ओडिसा, सिक्किम, केरल, मणिपूर, बिहार, नागालँड, मिझोराम, आंध्र प्रदेश, गुजरात, असम और तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
लॉकडाउन अथवा अंशतः लॉकडाऊनऐवजी राज्यात कोरोनाची तपासणी, जागरुकता अभियान असे उपाय केले पाहिजेत. निम सरकारी संस्थांत कोरोनाच्या नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. १८ वर्षावरील अधिक व्यक्तीचे लसीकरण सुरू केले पाहिजे. आरडब्ल्यूएच्या मदतीने कॉलन्या आणि समाजात लसीकरण मोहीम सुरू करण्याची सूचनाही पत्रातून केली गेली आहे.