इंडोनेशियाचे साखर उत्पादनात आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी उसाच्या चांगल्या प्रजातींवर लक्ष केंद्रीत

जकार्ता, इंडोनेशिया : देशांतर्गत मागणी आणि उत्पादनातील अंतर दूर करण्यासाठी आणि साखर उत्पादनात आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी इंडोनेशियाला उसाच्या चांगल्या प्रजातींची लागवड करण्याची गरज आहे, असे प्रतीपादन कृषी मंत्री सिया हरुल यासिन लिम्पो यांनी सांगितले. लिम्पो यांनी मंगळवारी पश्चिम जावाच्या दौऱ्यादरम्यान सांगितले की, साखरेची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी ऊसाच्या चांगल्या प्रजातींचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. ते म्हणाले की, देशातील साखरेचे उत्पादन २.४ दशलक्ष टनापर्यंत पोहोचले आहे. मात्र, देशातील साखरेची मागणी ३.२ दशलक्ष टन आहे.
मंत्री लिम्पो यांनी सध्याच्या ऊसाच्या वाणांना चांगल्या वाणांमध्ये बदलून साखरेचे उत्पादन लवकर कमी करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या शेतकरी जो ऊस वापरतात, त्याच्यापासून उत्पादन कमी मिळते. उत्पादनाचा दर ७ टक्के आहे. नऊ टक्के उत्पादन देणाऱ्या उसाच्या प्रजातीची गरज आहे. तरच साखर उत्पादनात वाढ होईल.

ते म्हणले की, राष्ट्रीय स्तरावर ऊस शेतीचे क्षेत्रफळ ४४८ हजार हेक्टर आहे. यापैकी २३४ हजार हेक्टर छोटे शेतकरी तर २०५ हजार हेक्टर कंपन्यांचे आहे. राष्ट्रीय उत्पादनात सुधारणा आणि २०२४ पर्यंत साखरेत आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ऊस तोडणीतील बदलांबाबतही त्यांनी भाष्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here