बिहारमध्ये आणखी इथेनॉल प्रकल्प उभारण्याची गरज : उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी

पाटणा : इथेनॉल उद्योगात बिहार स्वतःला एक प्रमुख घटक म्हणून प्रस्थापित करत आहे. त्याची उत्पादन क्षमता लक्षणीय वाढवण्याची योजना तयार केली जात आहे. भारतातील मक्याच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक असलेल्या या राज्यातील अधिकाधिक शेतकरी मक्याच्या लागवडीकडे वळत आहेत. कारण त्याचे बाजारभाव जास्त आहेत. हे दर सध्या सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) पेक्षा चांगले आहेत.

यासाठीची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि या क्षेत्रातील आपले स्थान आणखी मजबूतीसाठी, राज्य सरकारने १९-२० डिसेंबर रोजी ‘बिहार बिझनेस कनेक्ट’ शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी राज्यात अधिकाधिक इथेनॉल प्रकल्प उभारण्यावर भर दिला. ते म्हणाले की, बिहारमध्ये इथेनॉलचे आणखी प्लांट उभारण्याची गरज आहे. मका, तांदूळ आणि इतर धान्ये पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे आहे. कारण आम्ही कच्चा माल थेट इथेनॉल प्लांटला विकू शकू आणि यामुळे पैसेही उपलब्ध होतील.

याबाबत पीटीआयसोबतच्या पॉडकास्ट मुलाखतीत चौधरी यांनी बिहारची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांची रूपरेषा सांगितली. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर आणि राज्यात उच्च आर्थिक विकासाला चालना देण्यावर त्यांनी भर दिला. त्यांनी देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही कंपन्यांना बिहारला भेट देण्याचे निमंत्रण दिले. त्यांना सरकारकडून पूर्ण पाठिंबा देऊ केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बिहार एक मजबूत व्यावसायिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. बिहार तुमच्या पाठीशी उभे राहण्यास आणि तुमच्या यशासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यास तयार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here