कोल्हापूर:देशातील टेक्सटाईल नंतर देान नंबरचा असलेल्या साखर उद्योगाबाबत कोणताही उल्लेख नसून बजेटमध्ये काहीही तरतूद नाही, असे मत साखर उद्योग अभ्यासक पी.जी.मेढे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, साखर उद्योगाला बजेटमध्ये कर्जांची पुनरबांधणी, कमी व्याज दराचे कर्ज येाजना, साखर, इथेनॅाल दर, साखर निर्यात, सहविज निर्मिती दर आदीबाबत काहीतरी धोरणात्मक निर्णय होईल,अशी अपेक्षा होती. पण त्याबाबत काहीही धोरण जाहीर झालेले नाही. त्यामुळे त्यादृष्टीकेाणातून साखर उद्येागाची निराशाच झालेली आहे, असे म्हणावे लागेल.
मेढे म्हणाले, निदान यानंतर आगामी साखर हंगाम सुरु होण्यापूर्वी तरी साखर उद्योगाबाबत केंद्र सरकार ठोस निर्णय घेईल,अशी साखर उद्योगाला अपेक्षा आहे. तथापी एकच महत्वाची बाब म्हणजे एनर्जी सेक्टरसाठी बजेटमध्ये ६८,७६९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी १० हजार कोटी सौर उर्जेसाठी मिळणार आहेत. साखर कारखान्याना त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या मोकळ्या जागेवर सौर उर्जा प्रकल्प उभे करून जादा उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करता येणार आहे. याशिवाय कृषि क्षेत्रात उत्पादकता वाढ, पर्यावरणपूरक नवीन जाती निर्माण करणे, बियाणांमध्ये विज्ञान, रिसर्च ॲंड डेव्हलपमेंट या बाबींवर या बजेटमध्ये विशेष भर दिला असल्याने त्याचा साखर उद्योगास अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.