काठमांडू : आगामी सणांच्या आधी साखरेच्या दरात वाढ करण्यासाठी जर कृत्रीम टंचाई निर्माण केली तर कारवाई केली जाईल असा इशारा सरकारने व्यापाऱ्यांना दिला आहे. वाणिज्य, पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने (डीओसीएससीपी) दिलेल्या माहितीनुसार, सरकारी उद्योग आणि व्यापाऱ्यांकडे सुमारे ७५०००-८०,००० टन साखर उपलब्ध आहे. दशईं आणि तिहार सणांच्या कालावधीत २५,००० टन साखरेचा खप होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित साखरेचा साठा डिसेंबरच्या मध्यापर्यंत देशांतर्गत मागणी भागवू शकेल असे सरकारी सुत्रांचे म्हणणे आहे.
डिओसीएससीपीचे प्रवक्ते शिवराज सेधई यांनी सांगितले की, आयातदारांकडे पुढील तीन महिन्यांसाठी पुरेसा साखर साठा असल्याचे सांगण्यात आले आहे. सणांच्या आधी साखरेच्या दरात वाढ होण्याचे कोणतेही समर्पक कारण दिसून येत नाही. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा किरकोळ दर ८७ रुपये प्रती किलो इतका आहे. जर कोणीही या दरापेक्षा अधिक रक्कम घेत असेल तर अशांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सेधई यांनी दिला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link