नेपाळ: ऊस शेतकर्‍यांकडून सरकारबरोबरचा करार रद्द करण्याची घोषणा

काठमांडू: काठमांडू मध्ये विरोधी आंदोंलन करण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांपैकी एकाच्या मृत्युनंतर ऊस शेतकर्‍यांनी घोषणा केली की, त्यांनी सरकार बरोबर जो करार केला होता, त्याला रद्द केले आहे. सरलाही च्या 65 वर्षीय नारायण रे यादव यांना हृदय विकाराचा झटका आल्याने शहीद गंगलाल नॅशनल हार्ट सेंटर मध्ये निधन झाले. सरलाही च्या आंदोलनकर्त्यांपैकी एक मनीष मिश्रा यांच्या नुसार, यादव यांना सर्वात पहिल्यांदा हेल्पिंग हैंडस कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये दाखर करण्यात आले. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या हृदयात वेदना सुरु झाल्या, आम्ही त्यांना हेल्पिंग हैंडस रुग्णालयात आणले, पण त्यांना शहीद गंगलाल हॉस्पीटल मध्ये पाठवण्यात आले. शहीद गंगलाल हॉस्पीटलच्या डॉक्टर्सनी दाखल केल्यानंतर दोन तासात त्यांना मृत घोषित केले. मिश्रा यांच्या नुसार, यादव यांना अन्नपूर्णा साखर कारखान्याकडे 2.4 करोड रुपये देय आहेत आणि त्यांनी बँकेला जवळपास 1.8 मिलियन रुपये देणं आहे. आतार्यंत त्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. मिश्रा यांनी सांगितले की, आता या कराराला रद्द करण्यात येईल आणि शेतकरी तोपर्यंत काठमांडू येथून हटणार नाहीत. जोपर्यंत त्यांचे पूर्ण देय दिले जात नाही. आता आम्ही आमचा विरोध पुन्हा सुरु करु. गेल्या वर्षीही आम्ही सरकारवर डोळे बंद ठेवून विश्‍वास ठेवला होता पण सरकारने आम्हाला धोका दिला. यावेळी आम्ही आमचे पैसे घेतल्याशिवाय परतणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here