टोमॅटोच्या बदल्यात भारताने साखर देण्याची नेपाळची मागणी

देशात टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याने भारताने नेपाळमधून आयात सुरू केली आहे. आता नेपाळने त्या बदल्यात भारत सरकारला तांदूळ आणि साखर पाठवण्यास सांगितले आहे.

देशांतर्गत पुरवठा टिकवून ठेवणे आणि किरकोळ किमती नियंत्रणात आणण्यासाठी भारताने गैर बासमती तांदूळ निर्यातीवर निर्बंध लागू केल्याने नेपाळमध्ये दरवाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळने औपचारिक रुपात भारत सरकारकडे आगामी सणासुदीच्या काळात नेपाळला धान्य आणि साखरेच्या शीपमेंटमध्ये सवलत देण्यास आणि निर्बंध हटविण्यास सांगितले आहे.
नेपाळचे उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना १० लाख टन धान्य, १,००,००० टन तांदूळ आणि ५०,००० टन साखर गरजेची आहे.

उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव रामचंद्र तिवारी यांनी सांगितले की, आम्ही विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून भारत सरकारकडे धान्य आणि साखर पुरवठा करण्याची मागणी केली होती.

नेपाळच्या राष्ट्रीय ग्राहक मंचाचे अध्यक्ष प्रेम लाल महाराजन यांनी सांगितले की, “जर सरकारने तांदूळ, गहू आणि साखर आयातीस उशीर केला तर काळाबाजार करणारे किमती पुन्हा वाढवतील. ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here