काठमांडू : नेपाळही इंधन संकटाचा सामना करत आहे. आणि हे संकट कमी करण्यासाठी देशातील तज्ज्ञांनी इथेनॉल उत्पादनाचा प्रस्ताव दिला आहे. नेपाळनेही भारताच्या पावलावर पाऊल टाकत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातून इंधन आयात कमी करण्याचे प्रयत्न आहेत.
नेपाळ विज्ञान आणि तंत्रज्ञान अकादमीचे (NAST) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र ढकाळ यांनी सांगितले की, इथेनॉलचा वापर पर्याय म्हणून करता येईल. त्यांनी सांगितले की, देशभरात साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलचे उत्पादन सहजपणे केले जावू शकते. साखर आणि मोलॅसिसच्या उत्पादनंतर साखर कारखान्यांना उप उत्पादनाच्या रुपात शिल्लक राहिलेल्या अवशेषातून इथेनॉलचे उत्पादन केले जावू शकते. यातून नेपाळमधील इंधनाचे संकट कमी करण्यासाठी मदत मिळू शकेल.