काठमांडू, नेपाळ: नेपाळ सरकारने ऊस शेतकर्यांना गेल्या वर्षाची जवळपास सर्व सब्सिडी जाहिर केली आहे. कृषी आणि पशुधन विकास मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. हरि बहादुर केसरी यांनी सांगितले की, ऊस शेतकर्यांना 952 दशलक्ष रुपये वितरीत करण्याचे निर्देश आठ जिल्ह्यातील कोषागार आणि नियंत्रित कार्यालयांना देण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 च्या बजेट च्या घोषणेदरम्यान, वित्त मंत्रालयाने सरकारकडून देशभरातील ऊस शेतकर्यांना देण्यात येणार्या सब्सिडी साठी 950 दशलक्ष रुपये आणि 20 लाख आवश्यक प्रशासनिक खर्चांसाठी वाटप करण्यात आले.
मंत्रालयाने ऊस शेतकर्यांना प्रदान करण्यात येणार्या सब्सिडी अंतर्गत सर्व बजेट जाहीर केले आहे. गेल्या वर्षी साखर उत्पादनासाठी जवळपास 14.85 दहशलक्ष क्विंटल ऊसाचे गाळप करण्यात आले होते. नेपाळ सरकार साखर उत्पादनासाठी ऊसाच्या गाळपावर आधारीत सब्सिडी प्रदान करते. डॉ. केसी यांनी सांगितले की, मंत्रालय उर्वरीत निधी वित्त मंत्रालयाच्या समन्वयांतर्गत लवकरात लवकर जाहिर करेल.