नेपाळ सरकारने 2018-19 च्या अर्थिक वर्षाच्या अखेरीस देशातील साखर आयातीवरील निर्बंध उठवला असल्याचे वाणिज्य व पुरवठा मंत्रालयाचे प्रवक्ते दिनेश भट्टाराय यांनी सांगितले आहे. यापूर्वी सरकारने पुढील तीन महिने साखरेच्या आयातीवर बंदी कायम ठेवली होती. ती आता उठवण्यात आली आहे. यामुळे भारतीय साखर कारखान्यांना आपली साखर नेपाळ मध्ये निर्यात करण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे.
सरप्लस साखरेसाठी भारत अजूनही संघर्ष करतोय. या निर्यातीमुळे या संघर्षावर काही प्रमाणात अंकुश येईल. स्थानिक बाजारपेठेतील परदेशी साखरेचा पुरवठा मागणीपेक्षा कमी असून नेपाळी साखरेच्या तुलनेत महाग आहे. मार्चमध्ये सरकारने साखरेवरील आयात शुल्कात 15 टक्क्यांनी वाढ करुन स्थानिक साखरेला प्रोत्साहन दिले. पण स्थानिक साखर कारखान्यांनी याबाबत केलेल्या संघर्षामुळे नेपाळ सरकारने साखर आयात करण्यावर बंदी घातली होती.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.