साखरेच्या मोठ्या साठ्यामुळे अडचणीत असलेल्या भारतीय साखर उद्योग आणि केंद्र सरकार यांना आपल्या शेजारील असलेल्या नेपाल कडून गोड बातमी मिळाली आहे, नेपाल सरकारने भारतीय साखर आयात करणेस असलेली बंदी मागे घेतली आहे या निर्णयामुळे भारतीय साखर उद्योगास मोठा दिलासा मिळाला आहे, काही महिन्यापूर्वी नेपाल येथील साखर कारखान्यांच्या मागणीमुळे भारतीय साखर आयात करणेस बंदी घातली होती.
नेपाल सरकारचे प्रातिनिधिक संचार आणि सूचना प्राधिकृत मंत्री गोकुल प्रसाद बास्कोटा यांनी सांगितले की, नेपाल ने भारताकडून 20 हजार मेट्रिक टन साखर खरेदी केली आहे त्यामध्ये १० हजार मेट्रिक टन साखर ही खाद्य व व्यावसायिक वापरासाठी तर १० हजार मेट्रिक टन साखर ही चीनी साल्ट ट्रेडिंग कार्पोरेशन कंपनी खरेदी करणार आहे. भारतामधून आयातीत केलेल्या साखरेवर नेपाल पूर्वी लावत असलेल्या कस्टम शुल्का पैकी यानंतर फक्त ५०% शुल्क लावणार आहे.नेपाळच्या साखर उद्योगाने दावा केला आहे की तो इतर देशांच्या साखरेशी स्पर्धा करू शकत नाही, देशांतर्गत बाजारपेठेत आयातीत केलेल्या साखरेचा दर हा तुलना केल्यास नेपाल ची साखर ही महाग होती त्यामुळे साखरेला मागणी कमी होती. त्यानंतरच्या काळात नेपाळ सरकारने नेपाल मधील साखर उद्योग वाचविण्यासाठी साखर आयातीवर बंदी घातली होती.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.