बारा, नेपाळ: कलाइया मध्ये स्थानिक लोकांनी रिलायन्स शुगर अॅन्ड केमिकल इंडस्ट्रीज प्राइव्हेट लिमिडेट पासून प्रदुषण रोखण्याबरोबरच नुकसान भऱपाईची मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी दावा केला की, कारखान्यातून निघणार्या प्रदुषणकारी रसायनांमुळे स्थानिक नागरीकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. कारखाना प्रदूषण कमी करणे आणि भरपाई ची मागणी करुन श्रीपूर, मझौलिया आणि उत्तरजीतकाई सारख्या ठिकाणी शेकडो नागरीक कारखान्याविरोधात रस्त्यावर उतरले, आणि कारखान्यासमोर धरणे आंदोलन करत आहेत.
संंघर्ष समितीचे सदस्य इंद्रदेव कुशवाहा यांनी सांगितले की, लोक कारखान्यातून निघणार्या दूर आणि राखेमुळे आजारी पडत आहेत. पण कारखाना प्रशासन आणि उद्योग विभागाने ही समस्या दूर करण्यासाठी काहीही केलेले नाही. यासाठी आम्हाला नाइलाजाने आंदोलन सुरु करावे लागत आहे. स्थानिक नागरीक बीरेंद्र गोसाई यांच्या नुसार, औद्योगिक क्षेत्रामध्ये स्थानिक लोकांना डोळे दुखी, डोकेदुखी, जुलाब आणि श्वासाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. जवळपास सात वर्षापूर्वी कारखान्याच्या प्रदूषणाला नियंत्रीत करण्यासाठी स्थानिक लोक आणि उद्योग व्यवस्थापनाच्या दरम्यान 18 सूत्री करार झाला होता.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.