नेपाळ : नेपाळने देशात साखर तस्करी रोखण्यासाठीच्या प्रयत्नात गती आणली आहे. अलीकडेच नोपाळ पोलिसांनी साखर तस्करी बाबत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. कलैया जिल्ह्यातील दिनेश पांडे आणि रमेश तिवारी असे हे दोन आरोपी आहेत.
अहवालानुसार, पोलिसांनी 17 क्विंटल भारतीय साखर जप्त केली आहे. या साखरेला भारतातून तस्करी करुन आणले गेले होते.
पत्रकार परिषदेत बोलताना डीएसपी रंजीत सिंह राठोड म्हणाले, त्यांनी भारतीय साखरेवरील कस्टम ड्युटीचा कर भरला नव्हता, जो एका भाड्याच्या खोलीत संग्रहीत केला होता. पांडे यांच्या पत्नीकडून हनुमान ट्रेडर्स या नावावर नोंदणीकृत कंपनीने बेकायदेशीर साखरेची विक्री केली. पुढील तपासच सुरु आहे.
अलीकडेच, नेपाळ सरकारने भारतीय साखरवरील आयात प्रतिबंध हटवला होता. नेपाळच्या घरगुती साखर उद्योगाने असा दावा केला होता की, ते इतर देशातील साखरेबरोबर स्पर्धा करु शकत नाहीत. घरगुती बाजारात स्वस्त विदेशी साखरेच्या अत्याधिक पुरवठ्यामुळे महाग असणार्या नेपाळी साखरेची मागणी कमी झाली होती. यानंतर नेपाळ सरकारने घरगुती उत्पादनाच्या बाजाराला दिलासा देण्यासाठी साखरेच्या आयातीवर प्रतिबंध घातला होता.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.