काठमांडू : चार साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५४० दशलक्ष रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत.
याबाबत गृह मंत्रालयाने सांगितले की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकूण ६४० दशलक्ष रुपयांची बिले थकीत आहेत. त्यातील चार साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५४३ दशलक्ष ३१६ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध माहितीनुसार श्रीराम साखर कारखान्याने शेतकऱ्यांची सर्व थकीत देणी दिली आहेत असे मंत्रालयातील माहिती अधिकारी प्रेम लाल लमिछाने यांनी सांगितले. ते म्हणाले, श्रीराम साखर कारखान्याने सर्व शेतकऱ्यांना थकीत ऊस बिलांचे पैसे दिले असले तरी उर्वरीत तीन साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पैसे देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.
मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, इंदिरा साखर कारखान्याने ८.३ मिलीयन रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमाा केले आहेत. एकूण ४७ मिलियन रुपयांपैकी १५ मिलीनय रुपये बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आले आहेत.
अशाच पद्धतीने लुम्बिनी साखर कारखान्याने त्यांच्याकडे थकीत असलेल्या ८४.१ मिलीयन रुपयांपैकी ५१.१ मिलीयन रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहेत. आता कारखान्याकडे ३४ मिलीयन रुपये शिल्लक आहेत. तर अन्नपूर्णा साखर कारखान्याने १२६ मिलीयन ३७२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. त्यांच्याकडे अद्याप १७० मिलीयनची थकबाकी आहे.
मंत्रालयाने १५ डिसेंबर २०२० रोजी ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले नाहीत, अशा ठिकाणच्या जिल्हा अधिकाऱ्यांना साखर कारखान्यांच्या मालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काठमांडू येथे साखर कारखान्यांनी लाखो रुपये थकवल्याने आंदोलन सुरू केले होते.