काठमांडू: देशातील साखर कारखान्यांनी साखरेच्या एक्स गेट किमतीत दोन रुपये प्रतिकिलोची वाढ केली आहे. नेपाळ साखर उत्पादक संघाच्या म्हणण्यानुसार, दरातील या सुधारणेनंतर एक्स गेट साखरेची किंमत आता मूल्यवर्धीत कर (व्हॅट) वगळता ७० रुपये प्रतिकिलो झाली आहे.
संघाचे अध्यक्ष शशिकांत अग्रवाल यांनी सांगितले की, कोविड १९ महामारीमुळे उत्पादन खर्चावर परिणाम झाला आहे. त्यामुळे साखरेच्या दरवाढीशिवाय पर्याय उरला नाही. याशिवाय कच्च्या मालासाठी होणारा खर्च साखर कारखान्यांवर अतिरिक्त बोजा बनत आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या ऊस गाळप हंगामात सरकारने या वर्षी कृषी उत्पादनांचे किमान समर्थन मूल्य वाढवले आहे. हे मूल्य आता ५४३ रुपये प्रति क्विंटल झाले आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठीच्या किमान समर्थन दरामध्ये वाढ केली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखान्यांनी अशा पद्धतीने दरवाढ केल्याचा परिणाम मोठा होणार आहे. साखरेच्या किमतीमध्ये १० रुपये प्रतिकिलो वाढ होऊ शकेल.