काठमांडू : नेपाळमधील स्थानिक प्रसार माध्यमांतील माहितीनुसार, देशात सथ्या १० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. स्थानिक बाजारपेठेत टंचाईची स्थिती असल्याने साखरेच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या मते साखरेच्या दरात ८ रुपये प्रति किलो दरवाढ करण्यात आली आहे. आता साखरेचे कारखान्यातील मूल्य ८६ रुपये प्रती किलो आहे. यापूर्वी ते ७६ रुपये प्रती किलो होते.
यापूर्वी काही वेळा जेव्हा साखरेच्या आयातीत अडचणी आल्या, तेव्हा साखर कारखान्यांनी दरवाढ केली होती. आता कोरोना महामारीमुळे साखरेच्या आयातीत घसरण झाली आहे. मात्र, साखरेच्या आयातीवर सीमा शुल्कात १५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली. साखर कारखानदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे पुरेसा साखर साठा नाही. त्यामुळे दरवाढ सुरू असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे