काठमांडू : नेपाळमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपले पिक मिळेल त्या किमतीला विकावे लागत आहे. साखर कारखाने बंद पडल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस नाईलाजाने कमी किमतीने गूळ उद्योगाला द्यावा लागत आहे. शेतकऱ्यांना उसाला प्रती क्विंटल ४०० रुपये दर मिळत आहे. साखर कारखाना बंद पडल्याचा सर्वाधिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ऊस शेतीबाबतचे शेतकऱ्यांचे आकर्षण कमी होवू लागले आहे. रोहटक जिल्ह्यात एक कारखाना बंद आहे तर दुसऱ्या कारखान्यात गाळपाची काहीच तयारी दिसून येत नाही. गळीत हंगाम सुरू झाला असून सरकारने किमान ऊस दर निश्चित केला गेला नसल्याने तसेच साखर कारखाने बंद राहिल्याने, त्यांनी ऊस खरेदीची तयारी न दर्शविल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना मिळेल त्या किमतीला ऊस द्यावा लागत आहे.
गरुड नगरपालिका येथील श्री राम साखर कारखाना बंद राहिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गूळ उद्योगाला मिळेल त्या किमतीवर ऊस विकण्याची वेळ आली आहे. कारखाना बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्याही वेगाने घट होऊ लागली आहे. अशीच स्थिती गरुड साखर कारखान्याची आहे. कारखाना गेल्या वर्षांपासून बंद आहे आणि शेतकरी गूळ उद्योगाला स्वस्त दरात ऊस विक्री करू लागले आहेत. सरकारने या वर्षी या पिकासाठी अद्याप दर निश्चिती केलेली नाही. गेल्या वर्षी उसाचा दर प्रती क्विंटल ५९० रुपये निश्चित करण्यात आला होता. साखर कारखान्यांना आपला ऊस विकला तर शेतकऱ्यांना ६०० रुपये प्रती क्विंटल दर मिळतो.