नेपाळ: साखर कारखान्यांना भेडसावतेय ऊसाची टंचाई

काठमांडू : येथील साखर कारखाने कच्च्या मालाची कमतरता भेडसावत आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी उसाची थकबाकी वाढत असल्याचे पाहून नवी लागवड न करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी आपल्या मालाचे पैसे मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नेपाळ ऊस उत्पादक संघाच्या म्हणण्यानुसार १० साखर कारखान्यांना या वर्षीच उसाची कमतरता भासू शकेल. असोसिएशनचे अध्यक्ष कपिल मुनी मैनाली यांनी सांगितले की, बहूसंख्य शेतकऱ्यांनी उसाची लागवड केलेली नाही. सध्या सुरू असलेल्या बहूसंख्य साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोख पैसे देण्याचे आश्वासन देत थेट बांधापर्यंत पोहोचून उसाची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.

दरवर्षी गळीत हंगाम नोव्हेंबरच्या मध्यावर सुरू होतो. मात्र, या हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी ऊस बिले थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरोधात आंदोलन करत काठमांडूपर्यंत धडक दिली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या आश्वासनानंतरही २२० मिलीयन रुपयांहून अधिक थकबाकी आहे. गेल्या वर्षापासून चार साखर कारखाने बंद आहेत.

उर्वरीत साखर कारखानेही आपल्या उत्पादन क्षमतेच्या १० टक्केच उत्पादन करीत आहेत. उसाच्या कमतरतेमुळे जे साखर कारखाने दररोज एक लाख टन गाळप करू शकतात, असे कारखाने कसेबसे १०००० टन प्रतिदिन उसाचे गाळप करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here