पुणे: सांगली, सातारा व कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. हजारो हेक्टर ऊस क्षेत्र पुराच्या पाण्याखाली आल्याने या वर्षाच्या गळीत हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे. ऊस उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असून पूर्वीपासूनच अडचणीत असलेल्या साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे.
साखर उत्पादन करणाऱ्या देशांत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. राज्यातील सुमारे 50 पेक्षाअधिक साखर कारखाने सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांतच आहेत. यापैकी कोल्हापूरमधील 68,610, सांगली 20,571 तर सातारा 23,116.53 हेक्टर ऊस क्षेत्र पाण्यााखाली गेले आहेे.
कोल्हापुरात 26 लाख 73 मेट्रीक टन ऊस हातचा गेला आहे. त्याचा 800 कोटींचा फटका उस उत्पादकांना बसण्याचा अंदाज आहे. ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुरामुळे उसाचे क्षेत्र बुडाल्याने, त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.