नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत, सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. नव्या दरवाढीनंतर पेट्रोल ८८.९९ रुपये लिटर तर डिझेल ७९.३५ रुपये प्रतिलिटर या दराने मिळणार आहे.
काल, रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या दरवाढीच्या तुलनेत आज, सोमवारी पेट्रोलमध्ये २६ पैसे तर डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ करण्यात आली. यापूर्वी नुकत्याच सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलवर कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी सेस लागू केला. पेट्रोलवर प्रति लिटर २.५ रुपये तर डिझेलवर प्रतिलिटर ४ रुपये सेस लागू करण्यात आला आहे.
यापाठोपाठ पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या (१४.२ कि.) किमतीत ५० रुपयांची वाढ केली. त्यामुळे दिल्लीमध्ये आज गॅस सिलिंडरची किंमत ७६९ रुपयांवर पोहोचली आहे.