लातूर : वैशालीनगर, निवळी (ता.जि. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखाना लि.च्या नवीन मील रोलर पुजन बुधवार, दिनांक ०६.०९.२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या शुभ हस्ते होणार आहे. विलास साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. कारखान्याकडून आगामी गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
या कार्यक्रमाला संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, रंजीत पाटील, गोविंद डूरे, सुर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील यांच्यासह शेकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक संजीव देसाई आणि व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांनी दिली.