नवी दिल्ली : भारतीय इंधन कंपन्यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू केले आहेत. दीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यानंतर आता त्यात वाढ दिसून लागली आहे. मात्र, राष्ट्रीय बाजारपेठेत इंधन दर स्थिर आहेत. देशभरात ६ ऑक्टोबर रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात फेरबदल झालेला नाही. परंतु हा दर वाढू शकतो अशी शक्यता आहे.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारी कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रती लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोल ९२.७६ रुपये तर डिझेल १०६.०३ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या दराचा आढावा घेतल्यानंतर ऑईल मार्केटिंग कंपन्या आपल्या दराची निश्चिती करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडून दररोज सकाळी विविध शहरांतील दर अपडेट केले जातात. सध्या दिर्घ काळापासून कंपन्यांनी आपल्या दरात कोणताही बदल केलेला नाही. तुम्ही एक एसएमएस करून आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना यासाठी RSP कोड लिहून एसएमएस ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.