बागपत : बागपतमधील जवळपास सव्वा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना ऊस बिलाऐवजी साखर मिळत आहे. तर ऊस आयुक्त संजय आर. भुसरेड्डी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना साखर कारखान्यांकडून ऊस बिले देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांनी सांगितले की, ऊस आयुक्तांनी व्हर्च्युअल पद्धतीने ऊस बिलांचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांना बिलाऐवजी साखर देण्यात यावी असा आदेश कारखाना प्रशासनास दिला आहे. त्याच्या रक्कमेचे ऊस बिलात समायोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतकरी आपल्याला कारखान्याकडून दर महिन्याला मिळणाऱ्या एक क्विंटल साखरेची विक्री करू शकतात. शेतकऱ्यांना कारखान्याकडून साखर देण्यास अडवणूक झाल्यास सहकारी ऊस विकास समितीचे सचिव अथवा जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतात. शेतकऱ्यांची ऊस बिले न देणाऱ्या कारखान्यांना ऊस आयुक्तांनी कडक इशारा दिला आहे. ऊस गाळप, साखर उत्पादन, विक्री या घटकांबाबत आयुक्तांनी आढावा घेतला. मंजूर केलेल्या ऊसाचे गाळप केल्यानंतरच कारखाने बंद होतील. त्यामुळे मे महिन्यापर्यंत कारखाने सुरू राहतील अशी अपेक्षा आहे. बागपतमध्ये शेतकऱ्यांचे विविध पाच जिल्ह्यांतील १२ कारखान्यांनी ६५० कोटी रुपये थकवले आहेत.