शेतकऱ्यांसाठी उसाच्या नव्या प्रजातींचे पर्याय उपलब्ध

रुडकी : विभागात सर्वाधिक लागण केल्या जाणाऱ्या आणि शेतकऱ्यांमध्ये लोकप्रयित असलेल्या उसाची प्रजाती ०२३८ वर आलेल्या लाल सड रोगाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. ०२३८ प्रजातीवर दरवर्षी लाल सड रोग वाढतच चालला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनीही या प्रजातीच्या उसावर बंदी घातली आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांना ऊस लागवडीत अडथळे येवू नयेत यासाठी ऊसाच्या नव्या प्रजातींच्या पेरणीवर भर दिला जात आहे. ऊस विभागाने शेतकऱ्यांसाठी तीन प्रजातीच्या वाणांचा पर्याय ठेवला आहे. एससीडीआय प्रदीप वर्मा यांनी सांगितले की, विभागातील बहुतांश शेतकरी ०२३८ या प्रजातीचा ऊस लावतात. शेतकरी सद्यस्थितीत या उसावरच अवलंबून आहेत. सद्यस्थितीत या प्रजातीवर रोगाचा फैलाव वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर नव्या पर्यायांचा विचार करून ऊस पिकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here