शेतकरी चर्चासत्रातून मिळाली उसाच्या नव्या प्रजातींची माहिती

मुझफ्फरनगर : खतौली साखर कारखान्याच्यावतीने सिसौली येथे शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत हे अध्यक्षस्थानी होती. यामध्ये सिसौल आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

लाइव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भाकियूच्या मुख्यालयात आयोजित या परिसंवादात मुख्य ऊस संशोधक डॉ. विकास मलिक यांनी उसाच्या नव्या प्रजातीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी ५ टीच्या माध्यमातून आधुनिक शेती केली पाहिजे. ५ टीची माहिती देताना विकास मलिक यांनी सांगितले की, आपण जमिनीची गुणवत्ता तपासून वेळेवर लावण केली पाहिजे. ऊसाच्या वरील भाग लागणीसाठी चांगला आहे. उसाची ०२३८ ही प्रजाती लाल सड रोगामुळे लागवडीसाठी अयोग्य आहे. त्यामुळे १५०२३, १४२०१, १३२३५ या प्रजातींची लागवड करावी असे त्यांनी सांगितले. यावेळी खतौली शुगर मिलचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार यांनीही शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन केले. यावेळी महा व्यवस्थापक कुलदीप राठी, वरिष्ठ ऊस प्रबंधक दिनेश कुमार, विनोद मलिक यांनी मार्गदर्शन केले. चौधरी नरेश टिकेत यांनी शेतकऱ्यांना दूध उत्पादनात वाढीबाबत माहिती दिली. यावेळी ओमवीर सिंह, संजीव कुमार, गुलाब सिंह, संदीप कुमार, गजेंद्र, सुमित, किसान रेशपाल सिंह, इकबाल सिंह, रणवीर सिंह, रामपाल सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here