बरेली : कृषी संशोधकांनी ऊसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजातीची निर्मिती करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबरी दिली आहे. या प्रजातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसह उत्पन्न वाढणार आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारबरोबरच आपले कृषी संशोधकही विविध पिकांच्या प्रजातींवर प्रयोग करीत आहेत. नव्या प्रजातींपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल. कोईमतूरमधून नव्या १५०२३ या प्रजातीचे उसाचे बियाणे आणण्यात आले आहे. सोमवारी ऊस विकास विभागाच्या विभागीय अधिकारी पी. के. त्यागी यांनी झाऊनगला गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या प्रजातीचे पूजन करून त्याच्या लावणीची सुरुवात केली. या प्रजातीच्या उसाचे उत्पादन एकरी ८० ते ९० क्विंटल प्रती एकर असल्याचे त्यांनी सांगितले. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. शेतकरी रामकुमार आणि पप्पू यांनी सांगितले की, नव्या प्रजातीच्या उसाचा फायदा होणार असल्याने शेतकरी उत्साही आहेत. अधिक उत्पादन मिळाल्यावर आम्हाला आनंद होईल. यावेळी कुलदीप शर्मा, हरबीर सिंह, सुमित चौधरी, प्रेमपाल गंगवार, महावीर सिंह आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link