नवी दिल्ली : देशात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी नवी वाहे ऑगस्ट महिन्यात लाँच केली जातील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ANI सोबत एका मुलाखतीत गडकरी यांनी सांगितले की, ऑगस्टपासून मी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने लाँच करणार आहे. बजाज, टीव्हीएस आणि हिरो (Bajaj, TVS and Hero)ने १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल तयार केल्या आहेत.
ते म्हणाले की, टोयोटा कंपनी ६० टक्के पेट्रोल आणि ४० टक्के विजेवर चालणाऱ्या कॅमरी कारसह आता ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के विजेवर चालणाऱ्या गाड्या आणणार आहे. ते म्हणाले की, टोयोटा कंपनीची कॅमरी कारप्रमाणे ६० टक्के पेट्रोल आणि ४० टक्के विजेवर चालते. टोयोटाच्या माध्यमातून आम्ही असे वाहन लाँच करू जे ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के विजेवर धावतील. गडकरी म्हणाले की, ही योजना देशातील एक क्रांती ठरेल.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, हा एक क्रांतिकारी पाऊल असेल. कारण, आयात पर्याय, खर्च कमी, प्रदूषणमुक्ती आणि ते स्वदेशी असेल. भाजपने सर्वांसोबत न्याय करण्यास शिकवले आहे. राजकारण आणि विकास परस्परांना जोडू नयेत. मी भाजप कार्यकर्ता आहे. मात्र, सरकार देशातील जनेतेचे आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी सुद्धा सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास म्हणतात.
ते म्हणाले की, राजकारण बाजुला सोडून सर्व राज्यांमध्ये रस्ते विकासाची कामे करण्यात आली आहेत. अलिकडेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी आमची भेट झाली. आम्ही काही योजनांवर चर्चा केली. दक्षिणेकडील राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर अधिकारीही मला भेटायला येतात. मी त्यांच्यासोबतही बैठका घेतो. तेथील योजनांवर चर्चा करतो. यातून आम्हाला काहीच वाईट वाटत नाही. उलट आमचे सरकार यामुळे मजबुत होते.
भाजपचे दिग्गज नेते गडकरी यांनी म्हणाले की, आमच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात राजकारणाचा विचार न करता लोकांसाठी जे चांगले असेल, ते काम केले आहे. नऊ वर्षांच्या काळात मी माझे राजकीय विचार सरकारसोबत मिसळले नाहीत. आमचे रस्ते हे देशाची संपत्ती आहे. लोक चांगले रस्ते आणि योग्य विकासाचे हक्कदार आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांच्या रुपात गेल्या नऊ वर्षातील देशातील पायाभूत सुविधांमधील वाढ आणि कनेक्टिव्हिटी यामध्ये क्रांतीकारी बदलाबद्दल गडकरी यांना हायवेमॅन म्हटले जाते. देशामध्ये नवे तंत्रज्ञान आणणे आणि आधुनिक तंत्रज्ञानात गुणवत्तापूर्ण कामासाठी खासगी कंपन्यांच्या मदतीसाठीही गडकरी यांना पहिल्या एक्स्प्रेस वे (मुंबई-पुणे) चे श्रेय दिले जाते.