जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत न्युयॉर्क ठरले अव्वल, चीनला टाकले मागे

नवी दिल्ली : हेलने अँड पार्टनर्सने जगातील सर्वात श्रीमंत शहरांची यादी जाहीर केली आहे. ज्या शहरांमध्ये सर्वाधिक श्रीमंतांची निवासस्थाने आहेत, अशांमध्ये कोट्याधीश, अब्जाधीशांचा समावेश आहे. अशा श्रीमंतांच्या टॉप १० यादीत भारताच्या कोणत्याही शहराचा समावेश नाही. यामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिकेच्या न्युयॉर्क शहराचा समावेश आहे. या १०२३ शहरांच्या यादीत युरोपातील लंडन या एकमेव शहराचा समावेश आहे. अमेरिकेतील न्युयॉर्क शहरात ३,४०,००० कोट्याधीश, ७२४ सेंटी कोट्याधीश आणि ५८ अब्जाधीश आहेत. हे जगातील सर्वात श्रीमंतांचे निवासस्थान आहे. जगातील दोन मोठे स्टॉक एक्स्चेंज या शहरात आहेत. ब्रोंक्स, ब्रुकलिन, मॅनहॅटन, क्वींस, स्टेटन द्वीपाच्या पाच नगरांचा यात समावेश होतो.

आजतकमधील वृत्तानुसार, टोकियो या यादीत द्विती क्रमांकावर आहे. या शहरात २,९०,३०० कोट्याधीश, २५० सेंटी कोट्याधीश, १४ अब्जाधीश आहेत. टोकियोमध्ये जगभरातील बड्या कंपन्यांची मुख्यालये आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सॅन फ्रान्सिस्को शहराचा समावेश आहे. सिलिकॉन व्हॅलीचा समावेश असलेल्या या शहरात २,८५,००० कोट्याधीशांची घरे आहेत. याशिवाय शहरात ६२९ सेंटी कोट्याशीध आहेत. अब्जाधीशांबाबत या शहराने न्यूयॉर्कला मागे टाकले आहे. शहरात ६३ अब्जाधीश राहातात. जगातील आघाडीच्या टेक कंपन्या या शहरात आहेत. लंडन शहर पूर्वी कोट्याधीशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर होते. मात्र, गेल्या दोन दशकात हे शहर चौथ्या क्रमांकावर आले आहे. लंडनमध्ये २,५८,००० कोट्याधीश आहेत. ३८४ सेंटी कोट्याधीश, ३६ अब्जाधीशही या शहरात राहातात.

यादीत सिंगापूर, लॉस एंजेलिस, हाँगकाँग, बिजिंग, चीनची आर्थिक राजधानी शांघाई, ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरांचा समावेश आहे. हेनले अँड पार्टनर्समध्ये भारतातील बेंगळुरू शहराचाही समावेश आहे. गार्डन सिटी आणि इंडियन सिलिकॉन व्हॅलीच्या रुपात ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील श्रीमंतांची यादी पाहता यादीत या शहराला स्थान देण्यात आले आहे. बेंगळुरू टेक सेक्टरमध्ये गतीने विकसित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here