नवी दिल्ली : सरकारकडून इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याने २०२१-२२ या हंगामात गेल्या हंगामाच्या तुलनेत जादा इथेनॉल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, चालू हंगामात ५ जुलै २०२१ पर्यंत ३३३ कोटी लिटर इथेनॉलचे करार करण्यात आले आहेत. ऊसाच्या रसापासून आणि बी हॅवी मोलॅसिसपासून २३० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी २१ लाख टन साखरेचा वापर गरजेचा असतो.
ऊसाचा रस आणि बी हॅवी मोलॅसिस यापासून इथेनॉल उत्पादनात रुपांतर केले जाते. उच्च इथेनॉल उत्पादन क्षमता आणि पुढील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादन, ऊसाची रस, बी हॅवी मोलॅसीस यांपासून मोठ्या प्रमाणात इथेनॉलचे उत्पादन केले जाईल.
पुढील वर्षी २०२१-२२ मध्ये १० टक्के इथेनॉल उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण होईल. यासाठी सुमारे ४५० कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल. गेल्यावर्षी २०२०-२१ च्या तुलनेत ११७ कोटी लिटर अधिक इथेनॉलचे उत्पादन आवश्यक आहे. यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखी १३ लाख टन साखरेचे रुपांतर करावे लागेल. त्यामुळे पुढील हंगामात साधारणतः ३४ लाख टन साखरेऐवजी इथेनॉलचे उत्पादन होईल.
ऊसाचा रस आणि बी मोलॅसीस यांचे इथेनॉलमध्ये रुपांतर झाल्याने पुढील हंगामात ३४ लाख टन साखर कमी उत्पादन होईल. तर यावर्षी २१ लाख टन साखरेचा यासाठी वापर केला जाण्याची शक्यता आहे. इस्माने सांगितले की, जेव्हा निविदा भरल्या जातील आणि इथेनॉलचे करार केले जातील तेव्हाच याविषयी निश्चित रुपरेषा स्पष्ट होईल. इस्मामे २०२१-२२ मध्ये साधारणतः ३१० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामा इतकी साखर उत्पादित होणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link