NFCSF कडून राज्यातील १० साखर कारखान्यांचा १० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

कोल्हापूर : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे (NFCSF) गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम १० ऑगस्टला होणार आहे. यात विविध प्रकारांमध्ये देशातील २१ साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जाहीर झाले आहेत.पारितोषिक वितरण कार्यक्रम केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.

देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याला दिला जाणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

कार्यक्रमासोबतच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून, त्यानंतर साखर उद्योगाशी संबंधित दोन महत्त्वाच्या विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये साखर उद्योगातील तज्ज्ञ हे वर्तमान आणि भविष्यातील प्रश्नांचा वेध घेतील, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते कारखाने असे-

उत्तम ऊस उत्पादकता/उच्च उत्पन्न विभाग :

प्रथम : क्रांतिकारक डॉ. जी. डी. बापू लाड शेतकरी सहकारी कारखाना (पो. कुंडल, तालुका-पलूस, जिल्हा-सांगली)

द्वितीय : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना (सुंदरनगर, माजलगाव, जि. बीड)

तांत्रिक कार्यक्षमता / उच्च उत्पन्न विभाग:

प्रथम: श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना (माळशिरस, जिल्हा-सोलापूर, महाराष्ट्र)

द्वितीय : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना (जुन्नर, आंबेगाव, निवृत्तीनगर, जि. पुणे, महाराष्ट्र)

विक्रमी ऊस गाळप/उच्च उत्पन्न विभाग :

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना (गंगामाईनगर-पिंपळनेर, माढा, जि. सोलापूर, महाराष्ट्र)

विक्रमी ऊस रिकवरी :

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना मर्यादित (मोहनराव कदम नगर, वांगी, कडेगाव, जि. सांगली, महाराष्ट्र)

अत्युत्कृष्ट साखर कारखाना:

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना (कागल, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र)

साखरेची विक्रमी निर्यात :

प्रथम : जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना. (हुपरी-यळगूड, तालुका- हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र)

द्वितीय : सह्याद्री सहकारी साखर कारखाना (यशवंतनगर, तालुका-कराड, जिल्हा-सातारा, महाराष्ट्र).

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here