पुणे :नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टिज लिमिटेड (NFCSF) आणि नॅशनल को-आपरेटिव डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NCDC) ने ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या आगामी गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांना हार्वेस्टर पुरवठा करण्याची योजना आखली केली आहे. या योजनेचा ऊस तोडणी कामगारांवरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश आहे.अलिकडेच पुण्यात पत्रकारांशी चर्चा करताना NFCSF चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, NFCSF आणि NCDC संयुक्तपणे ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांना हार्वेस्टर उपलब्ध करून देण्याच्या योजनेवर काम करीत आहेत. सहकारी साखर कारखान्यांना त्यांच्या गाळप क्षमतेनुसार, हार्वेस्टर मिळतील. यातून वेळेवर आणि शास्रोक्त पद्धतीने ऊस तोडणी होईल.
महाराष्ट्रातील साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांनी ऊस कंत्राटदार आणि तोडणी कामगारांशी व्यवहार करण्यात वाढत्या अडचणींबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यामुळे ऊस तोडण्यात विलंब होत आहे आणि उत्पादनावर परिणाम होत आहे.ऊस तोडणाऱ्यांनी त्यांच्या सेवेसाठी जादा पैसे मागितल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांनी केल्या आहेत.गाळप प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी गेल्या दोन हंगामात इतर राज्यांतून हार्वेस्टर यंत्रे घेतली आहेत.’द हिंदू’मध्ये प्रकाशित वृ्त्तानुसार, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) च्या म्हणण्यानुसार, यांत्रिक तोडणीची गरज आहे आणि कारखाने आगामी गळीत हंगामात उद्दिष्टपूर्तीसाठी तयारी करीत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे. हार्वेस्टरसाठी सरकारी अनुदानात तेजी आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.