अबुजा : राष्ट्रीय साखर विकास परिषदेचे (NSDC) कार्यकारी सचिव जैच अदेदेजी यांनी सांगितले की, २०२३ मध्ये साखर आत्मनिर्भरता योजना आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटाद्वारे संचलित केली जाईल.
इलोरिन, क्वारा राज्यातील नायजेरिया शुगर इन्स्टिट्यूट (NSI) च्या अधिकृत समारंभात बोलताना अदेदेजी यांनी सांगितले की, नायजेरिया शुगर इन्स्टिट्यूट मुख्य रुपात व्यवस्थापन, प्रशिक्षणासोबतच नायजेरियाच्या अर्थव्यवस्थेसाठी साखर उप क्षेत्रामध्ये संबंधीत हितधारकांसाठी मुख्य प्रशिक्षण केंद्राच्या रुपात स्थापन करण्यात आली आहे. अदेदेजी यांनी सांगितले की, व्यवस्थापन, डेटा आणि तंत्रज्ञान साखर क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय साखर विकास परिषद नायजेरियाच्या शुगर मास्टर प्लॅनच्या (एनएसएमपी) सफल व्यवस्थापनासह साखर उत्पादनात आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी कटिबद्ध आहे.
सरकारने २०१२ मध्ये १० वर्षीय मास्टर प्लॅनला मंजुरी दिली होती. ही योजना चार प्रमुख उद्देशांवर आधारित आहे. नायजेरीयातील स्थानिक साखर उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवणे, वाढती साखर आयात रोखणे, साखर संपदा आणि रिफायनरींची स्थापना यासोबतच औद्योगिक उद्दिष्टांसाठी वीज आणि इथेनॉल उत्पादन करणे याचा यामध्ये समावेश आहे. एनएसडीसीचे सीईओ म्हणाले की, ही राष्ट्रीय साखर विकास परिषदेची प्रशिक्षण आणि विकास शाखा आहे. आमच्याकडे साखर व्यवसायातील विविध क्षेत्रांमध्ये जमिनीच्या स्तरावर प्रशिक्षित तज्ज्ञ आहेत. त्यांना त्यातील ज्ञानानुसार प्रशिक्षण व जबाबदारी दिली जाईल. शिवाय ही संस्था नायजेरियातील १०० हून अधिक लोकांना प्रत्यक्ष रोजगार प्रदान करते.